देवरुखमध्ये २९ पासून जय भंडारी चषक तालुकास्तरीय निमंत्रितांच्या भव्य कबड्डी स्पर्धा

देवरूख (सुरेश सप्रे) : देवरूख येथिल एस. आर. चॅलेंजर क्रीडा मंडळ भंडारवाडी देवरुख तर्फे दरवर्षीप्रमाणे जय भंडारी चषक तालुकास्तरीय (निमंत्रित) भव्य कबड्डी स्पर्धा – दि. २९ व ३० डिसेंबर २०२३ रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत. ईच्छुक संघानी आपली नावे खालिल ठिकाणी नोंदवावीत, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
आशिश पुसाळकर – ७७७४८५९३३९. निलेश तळेकर- ८४१२००४४५४. अभि तळेकर – ९३७३३५२११३ मयुर पुसाळकर – ८३८०८३३४९४
बाबा दामुष्टे – ९४२२३७१७९९ उमेश भोई ७२१९७४५३१२ ६. मंगेश्वर भाटकर ७७७४८५८८९८ स्वरुप तळेकर ९५६११२१२७१ यांचेकडे संपर्क साधावा..
या स्पर्धेत मंडळाचे वतीने प्रतिवर्षाप्रमाणे आकर्षक बक्षिसांची खैरात करणेत येणार आहे. त्यामध्ये विजेत्यांना ८०२३ व आकर्षक चषक. उपविजेता – ६०२३ व आकर्षक चषक. व तृतिय क्रमांक व चतुर्थ क्रमांक पटकावणाऱ्यांना हि रोख२०२३ व आकर्षक चषक १०२३ व आकर्षक चषक देवून गौरविण्यात येणार आहे.
तसेचवैयक्तीक बक्षिसे अष्टपैलू खेळाडु- होमथिएटर उत्कृष्ट चढाई- मिक्सर उत्कृष्ट पकड मिक्सर. प्रत्येक दिवसाचा मानकरी – मोबाईल,bसामन्याचा मानकरी- मनगटी घडयाळ
तसेच सर्व सहभागी संघांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. तरी तालुक्यातील कबड्डी प्रेमींनी हि कबड्डी चा थरार पाहणेसाठी आर्जवून उपस्थितीत रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे..