नाचणे येथे ६, ७ मे रोजी मुलांसाठी मोफत समर कॅम्प
रत्नागिरी : नाचणे ग्रामपंचायत व जि. प. पू. प्राथमिक विद्यामंदिर नाचणे नं १ यांच्या वतीने ३ ते १२ वयोगटातील मुलांसाठी विनामूल्य समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.पहिल्या वर्षीच्या प्रचंड प्रतिसादानंतर दुसऱ्या वर्षी दर्जेदार नियोजन करण्यात आले आहे. ओम साई मित्र मंडळ हॉल येथे हा समर कॅम्प आयोजित करण्यात आला आहे.
दि.६|५|२०२३ ते ७|५|२०२३ या दोन दिवशी सकाळी ७.३०.ते ११.३० या वेळेत हा समर कॅम्प होणार आहे.
योगा, जादूचे प्रयोग, ओरीगामी,क्राफ्ट, मनोरंजक खेळ, पक्षांचे आवाज, फेस पेंटिंग, आजी आजोबांच्या गोष्टी, बोलकं व्यासपीठ, लाईव्ह बालगीते, बडबडगीतं, रेकॉर्ड डान्स अशा प्रकारच्या भरगच्च कार्यक्रमांनी समर कॅम्प होणार आहे.
रत्नागिरी व मुंबईतील नामवंत कलाकार मार्गदर्शक म्हणून येणार आहेत. रत्नागिरी शहर व परिसरातील मुलांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन सरपंच ऋषिकेश भोंगले, उपसरपंच निलेखा नाईक,सदस्य शुभम सावंत, मुख्याध्यापिका अनुप्रिता आठल्ये, पदवीधर शिक्षक दीपक नागवेकर यांनी केले आहे.