प्रभानवल्ली खोरनिनको प्रीमियर लीग २०२४ क्रिकेट स्पर्धा उद्यापासून
लांजा : तालुक्यातील प्रभानवल्ली खोरनिनको यंग स्पोर्ट्समार्फत लांजा पूर्व विभागातील सर्वात मोठी प्रभानवल्ली-खोरनिनको प्रीमियर लीग 2024 हे क्रिकेट स्पर्धा २६ ते २८ जानेवारी २०२४
या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.
लांजा शहरानंतर लांजा पूर्व विभागातील सर्वात मोठी भव्यदिव्य लिग स्पर्धा म्हणून या स्पर्धेचा उल्लेख केला जातो.
या प्रीमियर लीगमध्ये दहा संघ मालक, दहा संघ व १४० खेळाडू असणार आहेत.
स्पर्धेतील प्रथम क्रमांकासाठी रोख रक्कम 20000 व आयसीसी वर्ल्ड कपची प्रतिकृती असलेली भव्य ट्रॉफी देण्यात येणार असून द्वितीय क्रमांकासाठी रोख रक्कम 15000 व आकर्षक चषक व तृतीय चतुर्थ क्रमांकाला आकर्षक चषक तसेच मालिकविर ठरणाऱ्या फलंदाजाला सायकल, ट्रॉफी व अन्य बक्षिसे, उत्कृष्ट फलंदाजाला कूलर ट्रॉफी, बॅट व अन्य बक्षिसे आणि उत्कृष्ट गोलंदाजाला फॅन, शूज, चषक व अन्य बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे. अन्य वैयक्तित बक्षिसांची खैरात या स्पर्धेत होणार आहे.
या स्पर्धेच्या माध्यमातून प्रभानवल्ली खोरनिनको प्रीमियर लीग क्रिकेटचा महासंग्राम पाहायला मिळणार आहे.
सर्व क्रिकेटप्रेमींच्या आग्रहाखातर प्रभानवल्ली खोरनिनको यंग स्पोर्ट्सच्या वतीने संपूर्ण स्पर्धेचं थेट लाईव्ह प्रक्षेपण युट्युबच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
ही स्पर्धा दि. २६ ते २८ जानेवारी २०२४ दरम्यान प्रभानवल्ली येथील वाघजाई मंदिर पटांगणात खेळवण्यात येणार असून सर्व क्रिकेटप्रेमींना ही स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मैदानावरील उपस्थितांना आयोजकांकडून दुपारच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्यांना प्रत्यक्ष येणे शक्य नसेल अशांनी या स्पर्धेचा आस्वाद युट्युच्या मध्यमातून घ्यावा, असे आयोजकांमार्फत श्री गौरव चौघुले यांच्याकडून कळविण्यात आले आहे.