महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त रविवारी जय भीम पदयात्रा

रत्नागिरी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त रविवार 13 एप्रिल रोजी सकाळी 7.30 वाजता येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडिअम येथून जयभीम पदयात्रेला प्रारंभ होणार आहे. या पदयात्रेचा समारोप जिल्हा शासकीय रुग्णालय समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन होणार आहे.
या पदयात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे.
रविवारी निघणाऱ्या जय भीम पदयात्रेमध्ये सर्व शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, एन.सी.सी., एन.एस.एस., भारत स्काऊट अँड गाईड, माय भारत व्हॉलेंटिअर मधील विद्यार्थी सहभागी होणार आहेत.