मत्स्यशेतीमध्ये प्रति जैविकांचा वापरावर बंदी’ या विषयावर रत्नागिरीत जनजागृती कार्यक्रम
रत्नागिरी : भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालय अंतर्गत पनवेल, नवी मुंबई येथे असलेल्या ‘सागरी उत्पादन विकास निर्यात प्राधिकरण’ यांच्या मार्फत मत्स्यशेती आणि निर्यात विकास प्रात्साहन करिता विविध योजना राबविल्या जातात, त्याकरिता विविध जनजागृती कार्यक्रम राबविले जातात. दि. ९ ऑगस्ट २०२४ रोजी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली अंतर्गत ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी आणि ‘सागरी उत्पादन विकास निर्यात प्राधिकरण (एम.पी.ई.डी.ए.), पनवेल’ यांचे संयुक्त विद्यमाने ‘मत्स्य शेतीमध्ये प्रति जैविकांच्या वापरावर बंदी’ या विषयावर जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाचा उदघाटन समारंभ सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी व प्रमुख डॉ. सुरेश नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आणि विद्यापीठ गीताने पार पडला. या कार्यक्रमाकरिता एकूण ३१ मत्स्य शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. उदघाटन समारंभ प्रसंगी डॉ. सुरेश नाईक (वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, सा.जि.सं.के., रत्नागिरी) यांनी ‘कोळंबी व मासे निर्यातीमध्ये आढळणारे प्रतिजैविकांचे प्रमाण पाहता मत्स्यसंवर्धन करताना संवर्धकांनी प्रतिजैविकांचा वापर करू नये’ असे आवाहन केले. तर कार्यक्रम समन्वयक डॉ. आसिफ पागरकर (सहयोगी संशोधन अधिकारी व प्राध्यापक) यांनी प्रतिजैविकांचा वापर आणि त्यांचा मानवी जीवनावर होणारा प्रतिकुल परीणाम याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सचिन साटम (सहाय्यक संशोधन अधिकारी) यांनी केले.
या जनजागृती कार्यक्रमांतर्गत ‘सागरी उत्पादन विकास निर्यात प्राधिकरण’, पनवेल येथील श्री. अतुल साठे (प्रक्षेत्र पर्यवेक्षक) तसेच सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी मधील डॉ. एस.डी. नाईक (वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी), डॉ. ए.यु. पागरकर (सहयोगी संशोधन अधिकारी), प्रा. एन.डी. चोगले, प्रा. एस.बी. साटम (सहाय्यक संशोधन अधिकारी) व श्रीम. व्ही.आर. सदावर्ते (जीवशास्त्रज्ञ) या विषय तज्ञांनी ‘मत्स्य शेतीमध्ये प्रति जैविकांच्या वापरावर बंदी’ तसेच ‘विविध आधुनिक मत्स्यसंवर्धन पद्धती आणि संधी’ या विषयांवर मार्गदर्शन केले.
सदर जनजागृती कार्यक्रम आयोजनाकरिता डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ, दापोलीचे आदरणीय कुलगुरू डॉ. संजय भावे; विस्तार शिक्षण संचालक डॉ. पराग हळदणकर; संशोधन संचालक डॉ. प्रकाश शिनगारे आणि एम.पी.ई.डी.ए., पनवेलचे उप-संचालक डॉ. टी. जीबीनकुमार यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र प्रमुख डॉ. एस.डी. नाईक यांचे मार्गदर्शन खाली डॉ. आसिफ पागरकर, डॉ. हरीश धमगाये, प्रा. नरेंद्र चोगले, प्रा. सचिन साटम व श्रीम. वर्षा सदावर्ते यांनी मेहनत घेतली. तसेच या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजन करिता संशोधन केंद्रातील कर्मचारी श्री. मंगेश नांदगावकर, श्री. महेश किल्लेकर, श्रीमती जाई साळवी, श्री. सचिन पावसकर, श्री. मनिष शिंदे, श्री. दिनेश कुबल, श्री. राजेंद्र कडव, श्री. सुहास कांबळे, श्री. सचिन चव्हाण, श्री. विवेक धुमाळ, श्री. प्रवीण गायकवाड, श्री. दर्शन शिंदे, श्री. तेजस जोशी, श्री. स्वप्नील आलीम, श्री. योगेश पिलणकर, श्री. उल्हास पेडणेकर, श्री. अभिजित मयेकर यांनी विशेष मेहनत घेतली.