महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराजकीयशिक्षण
मराठी भाषा विभागाचा १०० दिवसांचा उद्दिष्टीपूर्ती आढावा

रत्नागिरी : मराठी भाषा विभागाच्या १०० दिवसांच्या उद्दिष्टपूर्ती आणि कार्यालयीन सुधारणा या संदर्भात आढावा बैठक मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी घेतली.
या बैठकीत मराठी भाषा विभागाने पूर्ण केलेल्या उद्दिष्टांची तसेच पुढील वाटचालीची सविस्तर समीक्षा करण्यात आली. यामध्ये झालेल्या आणि प्रलंबित कामांचा आढावा घेऊन अपूर्ण बाबींची तातडीने पूर्तता करण्याच्या सूचनाही मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांच्यामार्फत संबंधितांना देण्यात आल्या देण्यात आल्या. मराठी भाषेच्या हिताच्या दृष्टीने काही महत्वपूर्ण निर्णय या आढावा बैठकीत घेण्यात आले.