महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूजशिक्षणसायन्स & टेक्नॉलॉजी

महाराष्ट्रातील १३२ शासकीय औद्योगिक संस्थांना मिळाली नवी ओळख

  • लांजातील आयटीआय आता लोकनेते शामराव पेजे यांच्या नावाने ओळखले जाणा
  • नामकरणास मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय जाहीर

मुंबई : कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारामुळे महाराष्ट्रातील १३२ शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण यशस्वी पणे करण्यात आले आहे. यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला आता लोकनेते शामराव पेजे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था लांजा अशी ओळख मिळाली आहे.

प्रथम १४ शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाद्वारे घेण्यात आला होता. महाराष्ट्रातील फक्त २ औद्योगिक संस्था सोडल्या तर इतर औद्योगिक संस्थांना या आधी कोणत्याही प्रकारची नावे नव्हती. त्यांनतर कौशल्य विकास विभागाद्वारे महाराष्ट्रातील शासकीय औद्योगिक संस्थांसाठी नागरिकांकडून नावाबाबत सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे राज्यातील १३२ आयटीआयचे नामकरण करण्याचा निर्णय आज जाहीर करण्यात आला. त्यानुसार अकोला, अमरावती, कोल्हापूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, धाराशिव, धुळे, नंदुरबार, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, बीड, बुलढाणा, भंडारा, मुंबई उपनगर, यवतमाळ, रत्नागिरी, रायगड, लातूर, वर्धा, वाशिम, सांगली, सातारा, सोलापूर आणि हिंगोली जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक संस्थांना नवीन ओळख मिळाली.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button