मालगाडीतून धूर येऊ लागल्याने कोकण रेल्वेची वाहतूक काही वेळासाठी थांबवली ; तपासणीनंतर पुन्हा सुरु

प्रत्यक्षात हे ‘मॉक ड्रिल’ असल्याचे कोकण रेल्वेकडून स्पष्ट
रत्नागिरी : रायगडमधील कोलाड येथून माल भरून डाऊन दिशेला जाणाऱ्या मालगाडीच्या ब्रेक कम जनरेटर व्हॅनमधून अचानक धूर येऊ लागल्यामुळे ही मालगाडी काही काळासाठी सुरक्षा तपासणीसाठी थांबवण्यात आली. यामुळे कोकण रेल्वेच्या वाहतुकीत काही काळासाठी वव्यत्यय निर्माण झाला. बुधवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, आगीसारख्या घटना घडल्यास रेल्वेची सुरक्षा यंत्रणा ‘अलर्ट’ आहे की नाही हे तपासण्यासाठी प्रत्यक्षात हे ‘मॉक ड्रिल’ असल्याचे रेल्वे कडून स्पष्ट करण्यात आले.
कोलाड येथून डाऊन दिशेला येणारी मालगाडी रत्नागिरी नजीकच्या भोके स्थानकाजवळ आली असता रेल्वे बोगद्याच्या बाहेर असताना मालगाडीच्या जनरेटर कम ब्रेक व्हॅनमधून अचानक धूर येऊ लागल्याचे निदर्शनास आले. अलीकडे रेल्वेच्या सर्वच गाड्यांमध्ये अग्निरोध यंत्रणा बसवण्यात आल्याने गाडीतून थोडा देखील धूर आला तरी ही यंत्रणा वेळीच अलर्ट करते. त्यानुसार बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास भोके रेल्वे स्थानकामध्ये मालगाडीच्या ट्रेन मॅनेजरच्या (गार्ड) डब्याजवळून अचानक धूर येत असल्याचे लक्षात. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मालगाडी तातडीने थांबवण्यात आली. कोकण रेल्वेकडून सुरक्षा उपायांची तपासणी केल्यानंतर सर्व काही ठीककठाक असल्याची खात्री करून जवळपास अर्ध्या तासाच्या खंडानंतर घटनास्थळी थांबवलेली मालगाडी मार्गस्थ करण्यात आली.
मालगाडीतून धूर येऊ लागल्याने ती थांबवण्यात आल्यामुळे काही काळासाठी खबरदारीचा उपाय म्हणून कोकण रेल्वेने वाहतूक रोखून. मात्र पुढील काही वेळात सुरक्षेची तपासणी झाल्यानंतर वाहतूक सुरू झाली. दरम्यान, कोकण रेल्वेकडून प्रत्यक्षात हे सुरक्षा यंत्रणेचा अलर्टनेस तपासण्यासाठी मॉक ड्रिल घेण्यात आल्याचे कोकण रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले.