महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज
रत्नागिरी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार मनूज जिंदल यांनी स्वीकारला

रत्नागिरी, दि. ९ : नूतन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. प्रशासनातील विविध अधिकाऱ्यांनी त्यांच्या स्वागत केले.
अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी पुष्पगुच्छ देऊन नूतन जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांचे स्वागत केले. जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी लोकराज्य चा अंक देवून त्यांचे स्वागत केले.