रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये अंदाजे ६४ टक्के मतदान ; कुठेही अनुचित प्रकार नाही
निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांची माहिती
रत्नागिरी, दि. ७ : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी आज सर्वत्र शांततेत आणि सुरळीत अंदाजे 64 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत 4 लाख 8 हजार 745 इतक्या पुरुष तर 3 लाख 98 हजार 816 इतक्या महिला अशा एकूण 8 लाख 7 हजार 562 मतदारांनी आज आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मतदार संघात मतदानावेळी कुठेही अनुचित प्रकार झाला नसल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.
जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत मतदारांनी विविध ठिकाणी आज अगदी सकाळपासूनच मतदान करण्यासाठी रांगा लावल्या होत्या. प्रशासनाने उन्हाची तिव्रता लक्षात घेऊन मंडप, पाणी, दिव्यांगांसाठी रॅम्प आदींची सुविधा केली होती. त्यामुळे मतदारंनी उत्स्फूर्तपणे बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावला. आज सांयकाळी 5 वाजेपर्यंत झालेल्या मतदानामध्ये 265 चिपळूण – 69 हजार 783 पुरुष, 72 हजार 175 महिला असे एकूण 1 लाख 41 हजार 958, 52.62 टक्के, 266 रत्नागिरी – 80 हजार 702 पुरुष, 82 हजार 224 महिला, इतर 1 असे एकूण 1 लाख 62 हजार 927, 57.46 टक्के, 267 राजापूर – 53 हजार 971 पुरुष, 56 हजार 604 महिला असे एकूण 1 लाख 10 हजार 575, 47.31 टक्के, 268 कणकवली – 64 हजार 789 पुरुष, 60 हजार 783 महिला असे एकूण 1 लाख 25 हजार 572, 55.14 टक्के,
269 कुडाळ – 67 हजार 633 पुरुष, 61 हजार 817 महिला असे एकूण 1 लाख 29 हजार 450, 60.96 टक्के, 270 सावंतवाडी – 71 हजार 867 पुरुष, 65 हजार 213 महिला असे एकूण 1 लाख 37 हजार 80, 61.07 टक्के,.
लोकसभा मतदार संघातील एकूण 14 लाख 51 हजार 630 मतदारांपैकी 8 लाख 7 हजार 562 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क सायंकाळी 5 वाजेपर्यंत बजावला. ही एकूण टक्केवारी 55.63 आहे. अंतिम आकडेवारी रात्री उशीरापर्यंत येण्याची शक्यता असून, 64 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 2019 च्या लोकसभा मतदानाची टक्केवारी 61.99 टक्के इतकी होती. त्या तुलनेत निश्चितच यावेळी मतदानात चांगली वाढ झाल्याचा अंदाज आहे.
लोकसभा मतदार संघात आज सांयकाळी 5 वाजेपर्यंत झालेल्या मतदान प्रक्रियेत एकूण 1 बीयु, 1 सीयु आणि 16 व्हीव्हीपॅट बदलाव्या लागल्या. यात 265 चिपळूण –व्हीव्हीपॅट 3, 266 रत्नागिरी –1 व्हीव्हीपॅट , 267 राजापूर – बीयु 1, सीयु 1, व्हीव्हीपॅट 2, 268 कणकवली –व्हीव्हीपॅट 5, 269 कुडाळ –व्हीव्हीपॅट 3, 270 सावंतवाडी –व्हीव्हीपॅट 2,
- हे सुद्धा वाचा : मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या मंगळूरूपर्यंत विस्ताराला प्रखर विरोध
- Konkan Railway | रेल्वेच्या यूटीएस ॲपवर ऑर्डिनरी श्रेणीतील तिकीटेही मिळू लागली!
- कोकण रेल्वेच्या खेड स्थानकावरून कंटेनरद्वारे मालवाहतुकीचा शुभारंभ