महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराष्ट्रीय

रत्नागिरीच्या ‘द मॉडेल इंग्लिश स्कूल’ सैतवडेचे दोन्ही डॉजबॉल संघ जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम

डेरवण, रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील क्रीडा विश्वात ‘दि मॉडेल इंग्लिश स्कूल, सैतवडे’ (The Model English School, Saitwade) च्या विद्यार्थ्यांनी आपली चमक दाखवली आहे. डेरवण येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय डॉजबॉल स्पर्धेत (Dodgeball Tournament Ratnagiri) मुलांचा आणि मुलींचा दोन्ही संघ जिल्हास्तरावर प्रथम आला असून त्यांनी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.

​मुलांच्या संघात खेळाडू आरव अविनाश जाधव, श्रवण मनोज जाधव, शुभम विनोद जाधव, वेदांत सहदेव धातकर, रुद्र महेंद्र जाधव, रजनेश रवींद्र पावरी, प्रेम मोहन पवार, पूजन रमेश धातकर, तन्मय संजय सावंत, ऋग्वेद मोरेश्वर झर्वे, आर्यन सुदेश पवार, आणि श्रेयस नरेश यादव यांचा दमदार खेळ पाहायला मिळाला.

​त्याचप्रमाणे, मुलींच्या संघात अक्षरा विनोद झर्वे, सई देवचंद्र पावरी, संजीवनी रमेश भुवड, श्रुतिका सुरेश निवेंडकर, वेदिका मनोहर डाफळे, निरजा प्रमोद पावरी, नंदिनी रवींद्र जाधव, धनश्री नारायण बळकटे, खुशी राजेंद्र आंबेरकर, आर्या विजय चौघुले, अन्वया निलेश पावरी, आणि सुरभी बळीराम सुर्वे यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.

​या संघाला क्रीडा शिक्षिका ऋतुजा राजेश जाधव (Rutuja Rajesh Jadhav) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. विलासराव कोळेकर (Vilasrao Kolekar), मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी, आणि सर्व स्टाफ यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. त्यांच्या प्रोत्साहनामुळेच हे यश शक्य झाले. प्रशालेच्या वतीने खेळाडूंचा आणि मार्गदर्शक शिक्षिकेचा यथोचित सत्कार करण्यात आला.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button