महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूजसायन्स & टेक्नॉलॉजी

रत्नागिरीच्या मत्स्य अभियांत्रिकी पदविका विद्यार्थ्यांचा रायगडमध्ये शैक्षणिक अभ्यास दौरा

रत्नागिरी : मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा दिनांक नऊ जुलै पासून दहा दिवसीय अभ्यास दौरा सुरू झाला आहे.

विद्यार्थ्यांनी ॲक्वाकल्चर इंजिनीअरिंग विषयाच्या अभ्यास दौऱ्यामध्ये प्रात्यक्षिकाद्वारे मत्स्य बीज निर्मिती मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांचा दि. ९ जुलै २०२४ पासुन हा दहा दिवसांची ॲक्वाकल्चर इंजिनीअरिंगमध्ये शैक्षणिक अभ्यास दौरा आहे.

दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे डॉ. संजय भाववे यांच्या संमत्तीने तसेच विद्यापीठाचे शिक्षण संचालक, डॉ. प्रशांत बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. या अभ्यास दौऱ्यामध्ये प्रात्यक्षिकांचा पहिल्या भागात श्रमजीवी जनता सहाय्यक मंडळ, महाड या संस्थेच्या गुरुत्वाकर्षण शक्तीवर चालणाऱ्या महाराष्ट्रातील पहिले विद्युत विरहित गोड्या पाण्यातील इंडियन मेजर कार्प प्रजातीच्या मत्स्यबीज उत्पादन केंद्र, खैरे, ता. महाड, जि. रायगड येथे आयोजित करण्यात आला होता.

या शैक्षणिक अभ्यास दौऱ्याच्या पहिल्या सहा दिवसाच्या भागामध्ये विद्यार्थ्यांनी प्रथमता श्रमजीवी जनता सहाय्यक मंडळ या संस्थेची ध्येय, उद्दिष्ट आणि संस्थेची विविध कार्य व कार्यपद्धती विषयी माहिती जाणून घेतली. गोड्या पाण्यातील व्यवसायिक दृष्ट्या कार्प जातीच्या विविध माशांची ओळख कशी करावी, नर व मादी कसे ओळखावे या बद्दल जाणून घेतले. त्यानंतर तलावातील मत्स्य जाळीने रोहू व कटला जातींच्या नर व मादी माश्यांच्या जोड्या पकडून त्यांना प्रजननासाठी प्रेरित करण्यासाठी संप्रेरकाची इंजेक्शन पद्धतीने मत्स्य बीज तयार केले. तयार केलेल्या मत्स्यबीज पॅकींग आणि वाहतूक पद्धतीचा अभ्यास केला.

याच बरोबर पाण्याचे विविध गुणधर्म कसे तपासायचे, तलावाची मशागत कशी करावी, बीज संचयन कसे करावे, मत्स्यबीज वरील रोग नियंत्रण आणि त्यावरील उपाय कसे करावे, मत्स्यखाद्य आणि त्याचे व्यवस्थापन या विषयी प्रात्यक्षिकांसह ज्ञान मिळाले.
सदरच्या अभ्यास दौऱ्यात १३ विद्याथी व ०४ विद्यार्थीनींनी सहभाग घेतला. श्री. तौसिफ काझी, श्री. निलेश मिरजकर, सहाय्यक प्राध्यापक आणि श्री. अभिजीत पाटील व श्री. दिग्विजय चोगले यांनी या दौऱ्याचे आयोजन व नियोजन डॉ. आशिष मोहिते, प्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली केले. अभ्यास दौऱ्याच्या या भागातील शेवटच्या दिवशी डॉ. आशिष मोहीते, प्राचार्य यांनी प्रत्यक्ष बीज उत्पादन केंद्राला भेट देवून विद्यार्थ्यांनी केलेल्या विविध प्रात्यक्षिकांन बद्दल माहिती जाणून घेवून विद्यार्थ्यांचे व प्राध्यापक वर्गाचे कौतुक केले.

या अभ्यास दौऱ्यामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकांसाठी सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल श्रमजीवी संस्थेचे श्री. विठ्ठल कोलेकर आणि श्री. संतोष जावरे यांचे मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम, शिरगांव, रत्नागिरी तर्फे आभार व्यक्त केले.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button