रत्नागिरीत आंबा बागायतदारांसाठी ७ नोव्हेंबरला मेळावा
रत्नागिरी, दि.31 : कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) तसेच जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील आंबा बागायतदारांसाठी ७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता जिल्हा परिषदेच्या कै. शामराव पेजे सभागृहात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यामध्ये आंबा पिकावरील रोग-किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना, आंबा पिकांसाठी मानांकन नोंदणी प्रमाणपत्र इ. विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील शास्त्रज्ञ आंबा पिकावरील कीड- रोगावरील उपाय योजनेसंबंधी मार्गदर्शन करणार आहेत. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त आंबा बगायतदारांनी मेळाव्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे यांनी केले आहे.
000