रत्नागिरीत आज पत्रकारांसाठी आरोग्य शिबीर

- मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजन
रत्नागिरी: मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त उदय सामंत प्रतिष्ठानच्या सहकार्याने जिल्हा शासकीय रुग्णालयात ३ डिसेंबर रोजी आरोग्य शिबीर आयोजित केले आहे.
मराठी पत्रकार परिषदेकडून दरवर्षी वर्धापन दिनानिमित्त पत्रकारांचे आरोग्य शिबीर घेतले जाते. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. मात्र त्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी या आरोग्य शिबीराचे आयोजन संपूर्ण राज्यात केले जाते. मराठी पत्रकार परिषदेतर्फे हा उपक्रम संपूर्ण राज्यात ३ रोजी होणार आहे. रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात ३ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता हे शिबीर सुरु झाले आहे.
नेहमी विविध सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात उदय सामंत प्रतिष्ठान अग्रेसर असते. पत्रकारांच्या या आरोग्य शिबीराच्या आयोजनासाठी उदय सामंत प्रतिष्ठानने सहकार्य केले आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात ३ डिसेंबर रोजी पत्रकारांसाठी आरोग्य शिबीर संपन्न झाल्यावर ४ डिसेंबर रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे. शासकीय रुग्णालयात रक्ताचा तुटवडा असून नागरिकांनीही रक्तदान शिबीरात सहभाग नोंदवावा असे आवाहन उदय सामंत प्रतिष्ठान, मराठी पत्रकार परिषद रत्नागिरी यांनी केले आहे.