रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरात नौका उलटून दोघे बुडाले; सहा जणांना वाचवले

रत्नागिरी : येथील मिरकरवाडा बंदरात मासेमारी करून परतणाऱ्या ‘अमीना आयशा’ नावाच्या नौकेला समुद्रात अजख लाटेमुळे जलसमाधी मिळाली. बंदरापासून हकाही अंतरावर असलेल्या भगवती बंदर ब्रेकवॉटर बॉलच्या टोकाजवळच लाटेच्या प्रचंड तडाख्याने ही नौका उलटली आणि त्यावरील मालक, तांडेल आणि सहा खलाशी असे एकूण आठ जण पाण्यात फेकले गेले. यापैकी सहा जणांना इतर मच्छीमार नौकांच्या मदतीने वाचवण्यात यश आले. पण दोन खलाशी बेपत्ता झाले होते. त्यातील एका खलाशाचा मृतदेह सोमवारी दुपारी आढळला तर दुर्घटनाग्रस्त नौकेला जलसमाधी मिळाली.

मासेमारी हंगामाच्या सुरूवातीलाच घडलेल्या या दुर्घटनेमुळे मच्छीमारांमध्ये शोककळा पसरली आहे. प्रतिनिधी रत्नागिरी दुर्घटनाग्रस्त अमीना आयशा मासेमारी नौका आयएनडी एमएच ०४ ६०४३) ही शब्बीर अ मजगांवकर रा. रत्नागिरी यांच्या मालकीची आहे. या दुर्घटनेत विनोद हिरू (मूळ रा. गोवा सध्या, रा. मांडवी), आणि इनामुद्दीन हसन (२४, रा सध्या रा, रत्नागिरी) हे दोघे बे होते. त्यापैकी विनोद धुरी या मृतदेह सोमवारी आढळून आला.