ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराजकीयलोकल न्यूजहेल्थ कॉर्नर

राजापुरात वाटूळ येथे १०० खाटांच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला मंजुरी

लांजा : अखेर मौजे वाटूळ तालुका राजापूर येथे १०० खाटांचे सुपर मल्टी स्पेशालिस्ट रुग्णालय मंजूर झाल्याचा निर्णय आज राज्य शासनाने घेतला असून हे रुग्णालय विशेष बाब म्हणून मंजूर झाल्याचा आदेश म्हणून पारित करण्यात आला आहे.

नुकतेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी कोकण विभागासाठी वाटूळ येथे प्रस्तावित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मंजूर करण्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली होती. लांजा राजापूर संगमेश्वर विधानसभा आमदार डॉ. राजन साळवी यांनीही वाटुळ येथे स्पेशालिस्ट रुग्णालय व्हावे, यासाठी पाठपुरावा केला होता. राजापूर तालुका संघर्ष समितीने या रुग्णालयासंदर्भात जनजागृती केली होती.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button