महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराजकीय
राजापूरमधून निवडून आलेले किरण सामंत यांनी घेतली आमदारकीची शपथ!

मुंबई : राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघातून निवडून प्रथमच निवडून आलेल्या महायुतीच्या किरण उर्फ भैया सामंत यांनी रविवारी विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात विधानसभा सदस्य म्हणून शपथ घेतली.
विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी विधानसभेच्या राजापूर मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांना पद गोपनीयतेची शपथ दिली. विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात नव्याने निवडून आलेल्या आमदारांना शपथ देण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आलेल्या पाचपैकी चार आमदारांनी शपथ घेतली आहे. त्यामध्ये किरण सामंत यांच्यासह जिल्ह्याचे माजी उद्योग मंत्री असलेले उदय सामंत, भास्कर जाधव तसेच योगेश कदम यांचा समावेश आहे.