राज्यस्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेत रत्नागिरीच्या फाटक हायस्कूलची चमकदार कामगिरी

रत्नागिरी : गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेत रत्नागिरीतील फाटक हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली. कोल्हापूर विभागाचे नेतृत्व फाटक हायस्कूलने केले.
19 वर्षे वयोगटातील मुलांची ही स्पर्धा 3 रोजी झाली. प्रज्वल काजरेकर, कविराज सावंत, साई तळेकर, वेदांत गवाणकर, सार्थक शिर्के, दीप भाटकर, मंथन अलीम, अमेय उभारे, सार्थक सनगरे, आर्यन वीर या खेळाडूंचा सहभाग या संघात होता.

पुणे विभागाविरुद्ध झालेल्या अत्यंत चुरशीच्या आणि अटीतटीच्या सामन्यात फाटक हायस्कूलचा निसटता पराभव झाला. प्रज्वल, कविराज व इतर खेळाडूंनी चांगला खेळ करत उपस्थितांची मने जिंकली. मार्गदर्शक मंदार सावंत, संघव्यवस्थापक संदीप आखाडे, मिनार कुरटे, ओंकार पोयरेकर यांचे या खेळाडूंना मार्गदर्शन लाभले.
संस्थेचे सर्व पदाधिकारी व मुख्याध्यापक राजन कीर, उपमुख्याध्यापक विश्वेश जोशी, पर्यवेक्षक नेहा शेट्ये, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खेळाडू व मार्गदर्शन करणाऱ्यांचे अभिनंदन केले.





