ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराजकीयलोकल न्यूजहेल्थ कॉर्नर
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाणीज येथे

संस्थानच्या रुग्णवाहिकांचे करणारी लोकार्पण
नाणीज, दि. २१: जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाहुणे म्हणून येणार आहेत. त्यांच्या समवेत उद्योग मंत्री उदय सामंत असतील.

मंत्री फडणवीस सकाळी मुंबईहून हेलिकॉप्टरने पालीकडे निघतील. तिथून ते व उदय सामंत मोटारीने नाणीजकडे येतील. दोघेही १२.१५ ते १.१५ ते नाणीजधाम येथे जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्यात सहभागी होतील. त्यांचा गौरव करतील. यावेळी मंत्र्यांच्या हस्ते संस्थानच्या रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर ते मुंबईला जातील.