राष्ट्रीय सिलंबम स्पर्धेत रत्नागिरीच्या गुरुप्रसाद सावंतला दोन कास्य पदके

रत्नागिरी:दि. 30 जानेवारी ते 02 फेब्रुवारी 2025 दरम्यान सी. एस. आय. हॉल कन्याकुमारी तामिळनाडू येथे लाठी- काठी तलवारबाजी, भाला चालवणे, दांडपट्टा (सुरूल) मडु इत्यादी क्रीडा प्रकारांमध्ये पहिली खुली राष्ट्रीय सिलंबम स्पर्धा पार पडली.
या स्पर्धेमध्ये तामिळनाडू,महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, राजस्थान, हरियाणा, पॉंडिचेरी, छत्तीसगड झारखंड इत्यादी राज्यातील 400 खेळाडूंनी सहभाग घेतला. स्पर्धेत महाराष्ट्राच्या 20 खेळाडूंनी सहभाग घेत आठ सुवर्ण 15 रौप्य 11 कास्य पदक संपादन केले. या संघामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील तालुक्यातील गुरुप्रसाद मिलिंद सावंत यांनी भाग घेऊन दोन कास्य पदके संपादन केली.

गुरुप्रसाद या खेळाडूला मुख्य प्रशिक्षक श्री. कुंडलिक कचाले यांचे मार्गदर्शन लाभले गुरुप्रसाद याची श्रीलंका येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सिलंबम स्पर्धेसाठी निवड झाल्याने युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिंग सेंटरचे अध्यक्ष राम कररा यांनी अभिनंदन केले.