रेशन दुकानावर ऑफलाईन धान्य वितरण करण्यास मंजुरी
भाजपाच्या मागणीला यश ; शिधापत्रिका धारकांची गैरसाई ठरणार
रत्नागिरी : भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी पदाधिकाऱ्यांसह अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत सध्या जिल्ह्यातील सर्व शासनमान्य रास्त धान्य दुकानात गेले अनेक दिवस ऑनलाईन धान्य वितरणाचा सर्व्हर डाऊन असल्याने रेशन कार्डधारकांचे बोटांचे ठसे उमटत नसल्याने रेशन कार्ड धारकाला तासनतास दुकानात बसून रिकाम्या हाताने परत जावे लागते. त्यामुळे सामान्य नागरिकांवर उपासमारीची वेळ येणार आहे असे समजताच तसेच रेशन कार्डधारकांना या महिन्याचे रेशन मिळण्यास त्यांना या महिन्याच्या रेशनपासून मुकावे लागणार होते या तांत्रिक बिघाडामुळे होणारी लोकांची गैरसोय तत्काळ थांबवावी. तत्काळ सामान्य जनतेला व रेशनकार्ड धारकांना त्वरित धान्य वितरण करावे, अशी मागणी भाजपाने केली होती. या बाबतच्या पाठपुराव्याला यश आले आहे
भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी याबाबत माहिती मिळताच तातडीने पदाधिकाऱ्यांसह अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांची भेट घेऊन जनतेच्या मागण्या मांडल्या. जिल्ह्यात तांत्रिक अडचणीमुळे शासनमान्य रास्त धान्य दुकानात धान्य मिळत नसल्याने ग्राहकांची कुचंबणा होत आहे. सर्व्हर डाऊन झाल्यामुळे तो बोटांचे ठसे घेता येत नसल्याने धान्य वितरण थांबले आहे. अशा वेळी ठसे न घेता रेशन वितरण करावे, अशी मागणी करत श्री. राजेश सावंत यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला.
भाजपच्या या मागणीला यश मिळेल असून धान्य पुरवठा ऑफलाइन पद्धतीने करावा अशा सूचना प्रशासनाकडून धान्य वितरकांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे लोकांना धान्य पुरवठा करण्यास होणारा विलंब टळणार आहे. यामुळे लोकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
जनतेचा त्रास कमी झाला असून याचे समाधान असल्याचे राजेश सावंत यांनी सांगितले. रेशन दुकानावरील अडचणींबाबत जनतेच्या तक्रारी असल्यामुळे भाजपा जिल्हाध्यक्ष सावंत यांच्यासमवेत पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांकडे व वरिष्ठ पातळीवर याबाबत पाठपुरावा केला होता.
यावेळी तालुकाध्यक्ष दादा दळी, विवेक सुर्वे, प्रशांत डिंगणकर, उमेश देसाई, भाजयुमो जिल्हाध्यक्ष डॉ. ऋषिकेश केळकर, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष भाई जठार, राजापूर मंडल अध्यक्ष सुरेश गुरव,रुपेश कदम, अमोल सिनकर, ज्येष्ठ भाजपा कार्यकर्ते महादेव गोठणकर, प्रथमेश धामास्कर, अभय लाकडे अमित विलणकर आदी पदाधिकारी ही उपस्थित होते.