लांजा-राजापूरवासियांनी मतदानातून दिलेले प्रेम हे सेवा करून फेडणार
- आमदार किरण सामंत यांनी दिला शब्द
- गोठणे दोनीवडे ग्रामविकास मंडळ मुंबई च्या 16 व्या वर्धापन दिनाला आमदार किरण सामंत यांनी लावली हजेरी
मुंबई : कला, क्रीडा, आरोग्य, सामाजिक, पर्यावरण अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या गोठणे दोनीवडे ग्रामविकास मंडळ मुंबईच्या 16 व्या वर्धापन दिनाला आमदार किरण सामंत यांनी उपस्थिती लावून या मंडळाच्या कामाला आणि कार्याला शुभेच्छा दिल्या.
गोठणे दोनिवडे ग्रामविकास मंडळ मुंबई येथे विविध क्षेत्रांमध्ये गेली 16 वर्ष कार्यरत असून त्यांच्या माध्यमातून वेगवेगळी कामे आज मुंबईच्या शहरा ठिकाणी केली जात आहेत त्याचा अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असून आपल्या मंडळाचे कार्य हे कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन यावेळेस किरण सामंत यांनी केले. आज योगायोग आहे की आजच्या या दिवशी मी विधानसभेचा आमदार म्हणून शपथ घेतली आणि शपथ घेतल्यानंतर पहिलाच कार्यक्रम या मुंबई मंडळाच्या माध्यमातून मी कोकणवासियांसाठी करत असल्याचा मला अभिमान आहे.
भविष्यकाळामध्ये लांजा राजापूर साखरपा वासियांनी मतदानातून दिलेले माझ्यावरील भरभरून प्रेम ही त्यांची आयुष्यात सेवा करून पूर्ण करेल असा शब्दही यावेळेस आमदार किरण सामंत यांनी या कार्यक्रमाला दिला.यावेळी गोठणे दोनिवडे ग्रामविकास मंडळ मुंबई आयोजित १६ वा वर्धापन दिन सोहळ्यात प्रमुख मान्यवर व सत्कार मूर्ती नवनिर्वाचित आमदार किरण उर्फ भैय्या सामंत साहेब यांचा मंडळाच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. येणारा काळामध्ये तुमच्या मंडळ सोबत मी भक्कमपणे उभा असून ज्या ज्या वेळेस मला माझी मदत लागेल त्यावेळेस हाक मारा मी तुमच्या पाठीशी असल्याचा विश्वास या वेळीस मंडळातील सदस्यांना किरण सामंत यांनी दिला.
यावेळी कार्यक्रमाला रवींद्र मटकर, संतोष जोगळे ,अनिल भोवडे ,संतोष चौगुले ,राजाराम राघव , मनोहर नाचरेकर, मारुती नेमण, राजेंद्र धुमक, भास्कर चव्हाण, सुनील राघव सुरेशमेस्त्री, विजय हातनकर, संतोष हातानकर, अविनाश राघव ,उमेश हातनकर, प्रकाश दळवी, मनोहर राघव, संदीप नाचरेकर, सचिन काने, यशवंत जठयार, यांच्या सहित गोठणे दोनिवडे ग्रामविकास मंडलाचे सर्व पदाधीकरी आणि सदस्य उपस्थित होते.