लांजात एक एकर क्षेत्रात केली रानभाजी कर्टूल्याची यशस्वी शेती!
लांजा : लांजा तालुक्यातील गवाणे येथील शेतकरी भगवान ढेकणे यांनी कोकणात प्रथमच सुमारे एक एकरात काजू बागेत करटूले (काटले) याची शेती यशस्वी करण्याची किमया केली आहे आणि आणि येथील शेतकऱ्यांना नवा आदर्श उभा केला आहे.
लांजा बाजारात करतोले सुमारें २०० ते ३०० रुपये किलो असलेली या भाजीला मोठी मागणी आहे. औषधी आणि रानभाजी असलेली ही करटूले भाजी व्यावसायिक शेती म्हणून उदयास आली आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, रानावनात, वन्य प्रदेशात वा डोंगरदऱ्यांत आढळणारे करटोलेचे पीक आता रत्नागिरी जिल्ह्यात रुजू पाहते आहे. लांजा तालुक्यातील गवाणे येथील शेतकरी भगवान ढेकणे यांनी प्रायोगिक शेती केली आहे.
बांधकाम व्यावसायिक असलेले भगवान ढेकणे यांनी गव्हाणे गावी शेतीचे विविध प्रयोग केले आहेत काजू पीक मोठ्या प्रमाणात आहे. काजू बाग असलेल्या या बागेत आंतरपीक म्हणून करटूळे शेती करण्याचा नवा प्रयोग केला कमी देखभाल खर्चात कमी कालावधीत चांगला दर मिळवून देणारे हे पीक असल्याचा अनुभव या शेतकऱ्यांला आला आहे. ढेकणे यांनी औरंगाबाद येथुन 500 अर्का भारत जातीची कंद रोपे आणून जून महिन्यात लागवड केली आहे. पिकाचा कीड-रोगांचा प्रादुर्भावही अत्यंत कमी असल्याचे ते सांगतात. तीन वर्षांत फळमाशीची समस्या मात्र उद्भवली. मात्र सापळे लावून ती नियंत्रणात आणल्याचे ते सांगतात. काढणीनंतर कंद सुप्तावस्थेत जात असल्याने त्यास पाण्याची गरज पडत नसल्याचे मुळे सांगतात. भगवान ढेकणे यांनी सांगितले की, पीक पद्धतीतील बदलातून एक एकरावर केलेली करटोलीची लागवड शेतीतील उत्साह वाढवून गेली. सर्वाधिक पसंती असलेल्या या भाजीला मोठी मागणी आहे औषधी वनस्पती आणि विवीध गुणधर्म आहेत. मी युट्युब वरून महिती घेउन ही लागवड केली आहे. त्यांनी गेल्या वर्षी हातखंबा येथे रानातून बिया कंद जमा करत दोन गुंठ्यात बीजोत्पादनासाठी लागवड केली होती. त्याला चांगले पिक आले. त्यातून यंदाच्या हंगामात जून महिन्यात औरंगाबादमधून अरका भारत कंद रोपे घेऊन आलो आणि लागवड केली. चार बाय सव्वा मीटर अंतरावर लागवड केलेल्या या करटोलीचे दीड महिन्यांत उत्पादन सुरू झाले. जून ते ऑगस्ट दरम्यान तीन तोडे झाले. लांजा येथे विक्री केली. त्यास 200 रुपयांपासून ते 250 रुपयांपर्यंत दर मिळाला आहे.
भगवान ढेकणे करटूल्याबाबत माहिती सांगतात की,
- मोमारडिका डायओयिका असे शास्त्रीय नाव. याला ‘वाइल्ड करेला फ्रूट’ असेही संबोधतात.
- वेल कोकण, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम घाट परिसरात आढळतात. कोकण, दक्षिण महाराष्ट्र आणि गुजरातेत काही प्रमाणात लागवड.
- वर्षायू वेल जंगलामध्ये झुडपांवर वाढतात. वेलींना जमिनीत कंद असतात.
- भोपळ्याच्या कुळातील वनस्पती. जून ते ऑगस्टमध्ये फुले व त्यानंतर फळे तयार होतात.
- डोकेदुखी, मुतखडा, विषबाधा, हत्तीरोग, आतड्यांच्या तक्रारी, ताप, बद्धकोष्ठता, दमा, श्वासनलिका दाह, उचकी, मूळव्याध यावर गुणकारी.
- करटोलीच्या फळांची भाजी कारल्यासारखीच असते. पावसाळ्याच्या अखेरीस ही भाजी बाजारात पाहण्यास मिळते. सर्दी, खोकला, ताप या पावसाळ्यातील विकारांवर भाजी हितावह असते.
- व्यावसायिक उत्पादन घ्यावयाचे असल्याने मजुरांच्या साह्याने नर व मादी फुलांचे परागीकरण केले. परिणामी अपेक्षित फळे मिळणे सुरू झाले. नैसर्गिक हिरवा पोपटी रंग असलेल्या या अर्का भारत वाणाच्या करटोल्याचे दिवसाआड ३० ते ४० किलो उत्पादन मिळते आहे. अधिक माहितीसाठी संपर्क: भगवान ढेकणे -9273861999