लांजावासियांना तब्बल एक महिन्यानंतर झाले सूर्यदर्शन !
लांजा : तब्बल एक महिन्यानंतर लांजात सूर्यदर्शन झाले आणि नागरिकांनी एक सुस्कारा टाकला. श्रावण महिन्याचे वेध लागले असून पावसाने सकाळपासूनच उघडीडीप दिली आहे. दरम्यान, पावसाने लांजा तालुक्यात आतापर्यंत अंदांजे 11 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे तर अनेक घरांची पडझड झाली आहे.
आतापर्यंत लांजा तालुक्यात 2803 मिलीमीटर पाऊस पडला आहे भांबेड येथील नयन पालकर यांच्या घराच्या बाजूची संरक्षण भिंत कोसळून नुकसान झाले आहे. लक्ष्मण लांजेकर राहणार पुनस यांच्या कलमाच्या बागेचे वादळाने सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
तालुक्यातील विलवडे येथील संदीप बिरजे यांच्या घराचे झाडाची फांदी तुटून नुकसान झाले आहे. लांजा तालुक्यात जुलै महिन्यात 2000 मिमी पाऊस बरसला. यामुळे जवळपास महिनाभर सूर्याचे दर्शनच झाले नव्हते. अतिवृष्टीमुळे तालुक्यात आतापर्यंत 11 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घरांचे औषधा नुकसान झाले आहे. दोन पाळीव जनावरे यांचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातमनुष्य जीवित आणि कुठेही नाही. काही ठिकाणी रस्ते वाहून जाण्याचे प्रकार घडले आहे. पाऊस चांगलाच बरसल्याने भात लावणणीची कामे पूर्ण होऊन आता नागली पिकाची श कामे सुरू आहेत. लांजा परिसरात आज शनिवारी सकाळी 11 वाजेपर्यंत स्वच्छ सूर्यप्रकाश नागरिकांनी अनुभवला.