वक्फ कायदा खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष : जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज

नाणीज : वक्फ बोर्डाबाबत कायदा केल्याने केंद्र सरकारचे विशेषतः पतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचे अभिनंदन. हा कायदा खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष आहे, असे प्रतिपादन जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांनी येथे केले.
जगद्गुरुश्री पुढे म्हणाले, ” आम्ही प्रयागराज येथे काही बॅनर्स लावली होती. त्यावरील घोषवाक्यांची देशविदेशात मोठी चर्चा झाली. प्रसारमाध्यमांनी त्याची मोठी दखल घेतली होती. त्यावर आम्ही सर्वांचे जनजागरण करण्यासाठी म्हटले होते, डरेंगे तो मरेंगे, सनातन सात्विक आहे पण कायर नहीं, हिंदू धर्ममे ऐकता हो. वक्फ के नाम पर संपत्ती की लूट है. धर्मनिरपेक्ष देश मे ए कैसी छूट है. अशा त्या स्लोगन होत्या. आज आम्हाला आनंद होत आहे की केंद्र सरकारने वक्फ बोर्डाबाबत नवा कायदा केला आहे. याबाबत आम्ही भारत सरकारचे अभिनंदन करतो. कारण आता खऱ्या अर्थाने गरीब मुसलमानांना न्याय मिळेल.”
ते पुढे म्हणाले,” ज्या अन्य धर्मियांवर अन्याय झाला आहे. ज्यांच्या जमिनी बळकावल्या आहेत. त्यांना वरच्या न्यायालयात दाद मागता येणार आहे. हा आम्ही विजय समजतो. मुस्लिम महिलांचा त्यामध्ये समावेश होतो आहे ही अतिशय आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे. या कायद्यानुसार अन्य धर्मीय दोन सदस्य या बोर्डावर घेतले जाणार आहेत. त्यामुळे हा कायदा धर्मनिरपेक्ष लोकशाहीचे प्रतीक आहे. याबाबत आम्ही भारत सरकार, विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचे अभिनंदन करतो. तसेच ज्या ज्या राजकीय पक्षांनी या कायद्याच्या बाजूने मतदान केले, त्यांचेही अभिनंदन करतो. त्यांनी यातून दाखवून दिले की भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. मतांसाठी कोणाचे लांगूलचालन करणार नाही. जो कायदा करू तो जनतेसाठी करू. ते त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. त्याबद्दल आम्ही सर्व संबंधियांचे अभिनंदन करतो.”