वर्ध्यातील राज्यस्तरीय सिकई मार्शल आर्ट स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याची चमकदार कामगिरी
वर्धा : नुकत्याच वर्धा येथे संपन्न झालेल्या 25 व्या राज्यस्तरीय सिकई मार्शल आर्ट स्पर्धेमध्ये डॉ. योगिता खाडे व हुजेफा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्याचा संघ सहभागी झाला होता. या स्पर्धेत 11 वर्षे खालील गटात गुहागरमधील विहंग जानवळकर याने ऐरो सिकई खेळ प्रकारात
प्रथम क्रमांक व लोबो (-32किलो) या खेळ प्रकारात द्वितीय क्रमांक पटकवला.
या स्पर्धेत 14 वर्षे खालील मुले लोबो :
प्रथम क्रमांक (-45 किलो) दानिश तडवी गुहागर. द्वितीय क्रमांक – (-53किलो) खुशीयाल गुप्ता रत्नागिरी.
14 वर्षे खालील मुली लोबो : प्रथम क्रमांक – (-53किलो) अन्वी जानवळकर गुहागर,
तृतीय क्रमांक – (-45किलो) मनाली घाडीगावकर गुहागर.
18 वर्षे खालील मुले लोबो : प्रथम क्रमांक –
(- 60किलो) सोहम हेगिस्टे गुहागर.
(-64 किलो)अथर्व पवार गुहागर.
द्वितीय क्रमांक – (- 52 किलो) शुभम भुवड चिपळूण.
तृतीय क्रमांक – (- 68 किलो) यश गुढेकर चिपळूण.
(- 48 किलो) रोहन गुढेकर चिपळूण.
ऐरो सिकई खेळ प्रकार : प्रथम क्रमांक विक्रांत गोलमडे, चिपळूण.
तृतीय क्रमांक ऐरो ग्रुप – यश गुढेकर, रोहन गुढेकर, शुभम भुवड चिपळूण.
18 वर्षे खालील मुली लोबो : प्रथम क्रमांक (-53 किलो) मंजिरी जानवळकर गुहागर.
द्वितीय क्रमांक – (-55 किलो) सृष्टी मोरे खेड,
18 वर्षे वरील मुले, प्रथम क्रमांक-
(-54 किलो) गुफ्रान खान गुहागर, (-58 किलो) हुजेफा ठाकूर गुहागर.
खवनके खेळ प्रकारात तृतीय क्रमांक –
k1 गुफ्रान खान गुहागर.
18 वर्षे वरील मुली : प्रथम क्रमांक –
(-50 किलो) संपदा निंबरे देवरुख.
या सर्व खेळाडूंना कोच म्हणून डॉ. योगिता खाडे आयरे, हुजेफा ठाकूर, स्वप्नाली पवार, शशिकांत उदेक,मंदार साळवी, प्रणित सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. वर्धा येथे संपन्न झालेल्या 25 व्या राज्यस्तरीय सिकई मार्शल आर्ट स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याला 11 सुवर्ण, 5 रजत, 7 कांस्य पदकाचे मानांकन, महाराष्ट्र असोसिएशनचे अध्यक्ष मझहर खान, सचिव रवींद्र गायकी यांच्यासह सर्व कोच व पालक यांनी हार्दिक अभिनंदन केले.