वाशिष्ठी दूध प्रकल्प कोकणसाठी अभिमानास्पद : पालकमंत्री उदय सामंत

- रत्नागिरीत दुग्ध उद्योगाला चालना – वाशिष्ठी मिल्क प्रॉडक्ट प्रकल्पाला पालकमंत्र्यांची भेट
चिपळूण : तब्बल 67 पेक्षा अधिक दुग्धजन्य पदार्थ बनवणारा वाशिष्ठी दुग्धोत्पादन प्रकल्प केवळ स्थानिक पातळीवरनव्हे तर अवघ्या कोकणसाठी अभिमानास्पद आहे, असे उदगार जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी काढले. वाशिष्ठी दुग्धोपादन प्रकल्पाला भेट दिल्यानंतर ते बोलत होते.
आज चिपळूण येथील श्री. प्रशांत यादव यांच्या वाशिष्ठी मिल्क प्रॉडक्ट या प्रकल्पाला पालकमंत्र्यांनी भेट देऊन सविस्तर माहिती घेतली व प्रकल्पाची पाहणी केली.

हा प्रकल्प केवळ स्थानिक नव्हे तर संपूर्ण कोकणासाठी अभिमानास्पद आहे. अल्प कालावधीत येथे ६७ पेक्षा अधिक दुग्धजन्य उत्पादने तयार केली जात आहेत – ही खरोखर गौरवास्पद बाब आहे, असे ते म्हणाले.
रत्नागिरीत मिल्क कलेक्शन कल्चर अद्याप रुजलेलं नाही, यावर सकारात्मक चर्चा झाली. हे कल्चर कोकणातही रुजावे, अशी आपली इच्छा आहे. पश्चिम महाराष्ट्राशी स्पर्धा करू शकणारा असा हा प्रकल्प आहे.
डॉ. उदय सामंत, उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य.
यावेळी रत्नागिरी शहरात वाशिष्ठी प्रॉडक्टचे एजन्सी सुरू करण्याचे निमंत्रण देण्यात आले. विशेष म्हणजे महाराष्ट्रात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या रत्नागिरी एस.टी. स्टँड परिसरात देखील शाखा सुरू करण्यासंदर्भात चर्चा झाली.
उद्योग, स्थानिक रोजगार आणि कोकणातील प्रगती यासाठी अशा प्रकल्पांचे मोठं योगदान असून, अशा प्रयत्नांना नेहमीच पाठिंबा राहील, असे पालकमंत्र्यांनी यावेळी आश्वस्त केले.