जगाच्या पाठीवरब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज

विशालकाय व्हेल मासा गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर!

गणपतीपुळे येथे व्हेल माशाला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न

रत्नागिरी : रत्नागिरी : खोल समुद्रातून गणपतीपुळे येथील किनाऱ्यावर भरकटत आलेला सुमारे चार टन वजनाचा ब्ल्यू व्हेल मासा आढळला. किनाऱ्यावर आल्यावर या माशाला पुन्हा समुद्रात जाणे अवघड झाल्याने स्थानिकांनी त्याला पुन्हा खोल समुद्रात सोडण्याचे प्रयत्न हाती घेतले आहेत.


या माशाला वाचवण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांसह वनविभागाचे कर्मचारी रात्री उशिरापर्यंत प्रयत्नशील होते. या माशाला दुपारी खोल पाण्यात सोडण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला होता. त्यामुळे सायंकाळनंतर भरतीच्यावेळी पुन्हा त्याला समुद्रात सोडण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आला आहे.

रत्नागिरी तालुक्यातील धार्मिक पर्यटनस्थळ असलेल्या गणपतीपुळे येथील समुद्रकिनार्‍याजवळ सोमवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास 30 ते 35 फूट लांबीचा व्हेल मासा आला होता. स्थानिक ग्रामस्थ व वॉटर स्पोर्टस संस्था, एमटीडीसीमधील कर्मचार्‍यांनी या व्हेल माशाला खोल समुद्रात सोडण्याचा प्रयत्न केला. परंतु हा व्हेल मासा पुन्हा समुद्रकिनारी वाहत आला. सायंकाळी ओहटी लागल्याने हा मासा वाळूवर आला होता. त्याला पाणी मिळावे म्हणून जेसीबी आणून खड्डा खणण्याचा प्रयत्न करण्यात आला.
हा प्रकार वनविभागाला कळवण्यात आला. त्यानंतर वनविभागाची धावपळ उडाली.

ग्रामस्थांनी याची माहिती मत्स्यविभागाला दिली. वनविभागानेही मत्स्य विभागाशी संपर्क साधल्यानंतर, मत्स्यविभागाने आपली गस्ती नौका गणपतीपुळे समुद्रकिनारी मदतीसाठी पाठवली. भरतीसुरु झाल्यानंतर सायंकाळी पुन्हा वनविभागाचे कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ, मत्स्य विभागाची नौका यांनी या माशाला समुद्रात सोडण्याचा प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरु होता.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button