रत्नागिरी अपडेट्स
वेतोशी येथील दोन कोटींच्या रस्ता विकासकामांचे भूमिपूजन

जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामान्य यांनी केला शुभारंभ
रत्नागिरी : रत्नागिरी- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील रत्नागिरी तालुक्यातील वेतोशी गावातील रस्ता डांबरीकरण नूतनीकरणाच्या दोन कोटीच्या निधीमधून होणाऱ्या कामांचे भूमिपूजन शनिवारी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.


या प्रसंगी जिल्हाप्रमुख राहुल पंडित,उपजिल्हाप्रमुख प्रकाश साळवी, तालुकाप्रमुख महेश म्हाप, सरपंच अरुण झोरे, उपसरपंच प्रणित कांबळे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





