सर्वसाधारणसह सांस्कृतिक स्पर्धेचे विजेतेपद रत्नागिरीकडे
कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा समारोप
रत्नागिरी, दि. 15 : गेले तीन दिवस येथे चाललेल्या कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा समारोप आज झाला. विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते झालेल्या पारितोषिक वितरण समारंभात सर्वसाधारण आणि सांस्कृतिक स्पर्धेच्या विजेतेपदाचा मानकरी यजमान पद असलेला रत्नागिरी जिल्हा ठरला तर, उपविजेते पद मुंबई उपनगर जिल्ह्याला मिळाले.
पारितोषिक वितरण समारंभ प्रंसगी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह,पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना आयुक्त डॉ.कल्याणकर म्हणाले, स्पर्धा सकारत्मकतेने घेतली पाहीजे. रत्नागिरीने 368 गुण मिळवत विजेतेपद मिळविले. हा एकोपा असाच टिकवून ठेवा. प्रशासकीयदृष्टया देखील कोकण विभाग पुढे आहे. महसूल विभागात अनेक चांगले खेळाडू आणि कलाकार आहेत. पुढील वर्षाच्या स्पर्धेसाठी सुरुवर्षापासूनच खेळाडूंची निवड व्हावी.
पुढील वर्षी सिंधुदुर्गात स्पर्धा
पुढील वर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यात या स्पर्धा भरवण्याचा मान दिला जात आहे. 20, 21, 22 डिसेंबर कालावधित या स्पर्धा होतील, असे सांगून डॉ. कल्याणकर यांनी क्रीडा ध्वज सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे सोपविला.
जिल्हाधिकारी श्री.सिंह म्हणाले, या स्पर्धेसाठी सर्वांनी खूप मेहनत घेतली आहे. खिलाडू वृत्तीने स्पर्धा पार पडली. सांस्कृतिक कार्यक्रम चांगले झाले. टीम स्पीरीट सर्वानीच चांगले दाखवले. प्रदर्शन सर्वांनी चांगले केले. आरोग्य चांगले ठेवा. आनंदी रहा, असा संदेशही दिला.
सांघिक स्पर्धा निकाल
क्रिकेट मध्ये प्रथम विजेता रत्नागिरी तर उपविजेता मुंबई उपनगर,फुटबाल मध्ये प्रथम विजेता सिंधुदुर्ग तर उप विजेता ठाणे,हॉलिबॉल मध्ये प्रथम विजेता रत्नागिरी तर उप विजेता मुंबई शहर,थ्रो बॉल मध्ये प्रथम विजेता रत्नागिरी तर उप विजेता मुंबई उपनगर,खो-खो (पुरुष) प्रथम विजेता ठाणे तर उप विजेता मुंबई उपनगर,खो-खो(महिला) प्रथम विजेता रत्नागिरी तर उप विजेता रायगड,कबड्डी मध्ये प्रथम विजेता रत्नागिरी तर उप विजेता रायगड,संचलन मध्ये प्रथम विजेता रत्नागिरी तर उप विजेता रायगड आहे.