हे १२ पुरावे असतील तरीही करता येणार मतदान!
निवडणूक आयोगाचे ओळखपत्र नसले तरी चिंता नको
रत्नागिरी : राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मतदान करण्यासाठी मतदान केंद्रात निवडणूक आयोगाने दिलेल्या मतदार छायाचित्र ओळखपत्रासह ठरवून देण्यात आलेले अन्य बारा पुरावे देखील ग्राह्य धरले जाणार आहेत.बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी यंत्रणेमार्फत पूर्ण झाली आहे. मतदारांनी मतदानासाठी बाहेर पडावे यासाठी निवडणूक विभागाने जनजागृतीचे उपक्रम देखील राबवले. केवळ निवडणूक आयोगाने दिलेले ओळखपत्र नाही म्हणून मतदानासाठी न जाणाऱ्या मतदारांना मतदानाकरिता अन्य 12 पुरावे देखील ग्राह्य धरले जातील, असे निवडणूक विभागाने कळविले आहे. यामध्ये पॅनकार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट, वाहन चालवण्याचा परवाना अशा एकूण 12 पुराव्यांचा त्यामध्ये समावेश आहे.