आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेतील जाचक अटी काढून टाकणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेतील जाचक अटी काढून टाकण्यासह पत्रकार सन्मान योजनेच्या लाभासाठी ६० ऐवजी ५८ वय आणि ३० वर्षे ऐवजी २५ वर्षे अनुभव या बद्दल निर्णय घेणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान सोहोळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही महत्वपूर्ण घोषणा केल्या. या घोषणांमध्ये शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधी आणि आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना या दोन्ही योजना स्वतंत्र करणार, आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना द्वारा ज्येष्ठ पत्रकारांना देण्यात येणारी रक्कम ११ हजार रुपयांवरुन २० हजार रुपयेकेली जाणार आहे.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेतील जाचक अटी काढून टाकून सन्मानाने योजनेचा लाभ देणार असल्याचे सांगून आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना ६० ऐवजी ५८ वय आणि ३० वर्षे ऐवजी २५ वर्षे अनुभव या बद्दल निर्णय घेणार आमचे मुख्यमंत्री म्हणाले.
अधिस्वीकृती समितीचे तातडीने गठन करण्याचा शासन निर्णय त्वरित काढणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसोबत राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हेही उपस्थित होते.