आम आदमी पार्टीचे सदस्य नोंदणी अभियान
उरण(विठ्ठल ममताबादे) : भारतात आम आदमी पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे.आम आदमी पक्ष आता राष्ट्रीय पक्ष बनला आहे. दिवसेंदिवस आम आदमी पार्टीला जनतेचा मोठ्या प्रमाणात पाठींबा मिळत आहे. अनेक जन पक्ष प्रवेश सुद्धा करत आहेत.आगामी नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद आदी निवडणुका समोर ठेऊन योग्य रणनीती आखत आम आदमी पक्षाने उरण मध्ये सदस्य नोंदणी सुरु केली आहे.
आम आदमी पक्षाचे प्रचार व प्रसार करणेकरीता व पक्ष संघटना मजबूत करणे कामी आम आदमी पक्षाने सदस्य नोंदणी अभियान करण्याचे ठरविले असून दिनांक 24 /1/2023 ते 2/2/2023 पर्यंत सकाळी 8:30 ते सांयकाळी 7.30 या वेळेत उरण शहरातील संतोष आईस्क्रीम सेंटर (जूना बस स्टँण्ड), खिडकोळी नाका, गणपती मंदिर चौक, सेंट मेरी स्कूल समोर, वैष्णवी हॉटेल समोर, आनंदनगर, मोरा-साईबाबा मंदिर समोर, उरण नगरपरिषदे समोर, उरण कोटनाका, उरण मस्जिद मोहल्ला, चारफाटा, बोरीनाका या ठिकाणी स्टॉलवर(बूथ वर )पदाधिका-यांतर्फे सदस्य नोंदणीचे फॉर्म भरवून घेतले जाणार आहेत. भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटण करण्यासाठी व सुयोग्य प्रशासन, मोफत दर्जेदार शिक्षण,मोफत पूर्ण आरोग्य सेवा, महिलांना संरक्षण, युवकांना रोजगार, मोफत वीज, शेतकऱ्यांच्या शेत उत्पादन मालाला योग्य भाव मिळावा यासाठी पक्षाचे हात मजबूत करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी सदस्य नोंदणीचे फॉर्म भरून आम आदमी पार्टीचे सदस्य व्हावे असे आवाहन आम आदमी पार्टीचे उरण विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष संतोष भगत यांनी केले आहे.