गुजरातमध्ये महिसागर नदीवरील पूल कोसळला ; वाहने कोसळून नऊ जणांचा मृत्यू

वडोदरा : गुजरातमधील बडोद्यामधील महिसागर नदीवर असलेल्या एका पुलाचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत अनेक वाहनं नदीत पडली आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार बडोदामध्य़े बुधवारी पहाटे एक जीर्ण पूल कोसळला आहे. त्यामुळे अनेक वाहने महिसागर नदीत पडली आहेत. या घटनेत किमान नऊ जणांचा मृत्यू झाला आहे, तर नऊ जणांना वाचवण्यात यश आलं आहे. तसेच काही जण गंभीर जखमी झाले आहेत.
आणंद आणि वडोदरा या दोन जिल्ह्यांना जोडणारा गंभीरा पूल बुधवारी सकाळी अचानक कोसळला. पूलावरून वाहने जात असताना ही दुर्घटना घडली, त्यामुळे अनेक वाहने नदीत कोसळली. या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला. अनेक वाहने नदीत कोसळल्याने मोठ्या जीवितहानीची भीती आहे. सरकारी अधिकाऱ्यांकडून तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. त्याशिवाय वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे.
गंभीरा ब्रिजमध्येच तुटून दुर्घटना झाल्याचे समजताच बचावपथकाने तात्काळ धाव घेतली. या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ब्रिज तुटल्यामुळे नदीत चार वाहने पडली आहेत. बचावपथकाने आतापर्यंत चार जणांना वाचवले आहे. नदीमध्ये इतरांचा शोध घेतला जात आहेत. बचावकार्य अद्याप सुरू आहे.
पोलिसांनी काय सांगितले ?
पोलिसांनी सांगितले की, गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यात बुधवारी सकाळी एका पुलाचा काही भाग कोसळल्याने किमान चार वाहने नदीत कोसळली. पडारा पोलिस निरीक्षक विजय चरण यांनी सांगितले की, आतापर्यंत चार जणांना वाचवण्यात यश आले आहे, बचावकार्य अजूनही सुरूच आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, राज्य महामार्गालगत महिसागर नदीवर असलेला गंभीरा पूल सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कोसळला. यामुळे चार वाहने नदीत कोसळली. दोन ट्रक आणि दोन व्हॅनसह अनेक वाहने नदीत पडली. आतापर्यंत आम्ही चार जणांना वाचवले आहे.