काळ आला होता…पण वेळ आली नव्हती!

- दाभोळ-मुंबई एसटी बस भरलेल्या धरणात कोसळता कोसळता वाचली
- दोन घटनांमध्ये ९१ एसटी प्रवासी थोडक्यात बचावले
दापोली / राजापूर : मंडणगड ते म्हाप्रळ दरम्यान शेनाळे घाटामध्ये चिंचाळी धरणाच्या ठिकाणी दाभोळ – मुंबई एस.टी. बस रस्ता सोडून सुमारे १५ फुट खाली घसरून उलटल्याने अपघात झाला. सोमवार १३ जानेवारी रात्री पावणे दोन वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात कोणत्याही प्रवाशांना गंभीर दुखापत झाली नाही. यावेळी गाडीमध्ये चालक वाहकासह ४१ प्रवासी प्रवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात ३० प्रवाशांना दुखापती झाल्या.

दाभोळ-मुंबई मार्गावर एसटी बसला झालेल्या या अपघाताबरोबरच सांगली येथून राजापूरला येणाऱ्या बसचे अणुस्कुरा घाटात ब्रेक निकामी झाल्याने चालकाने प्रसंगावधान राखून जाणून बुजून दर्डीवर नेल्यामुळे दरडीवर आढळून थांबली. यामुळे बस दरीत कोसळून ५० प्रवाशांच्या जीवितरा निर्माण झालेल्या धोका टाळला.
दरम्यान, या दोन्ही घटनांमध्ये प्रवाशांसाठी ‘काळ आला होता पण वेळ आला आली नव्हती’ याचा प्रत्यय आला. या दोन्ही ठिकाणच्या अपघातांमध्ये घटनास्थळावरची परिस्थिती पाहता मोठ्या जीवित आणि हानीची भीती होती. मात्र, दाभोळ-मुंबई एसटी बसला तेथील झाडाने तसेच दगडाने तारले. तर अणुस्कुरा घाटातील एसटी बस अपघातात चालकाचे प्रसंगावधान कामी आले.