महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूजशिक्षणसायन्स & टेक्नॉलॉजी
कृषिकन्यांमार्फत भात लागवडीमध्ये आधुनिक पद्धतीचा वापर

आबिटगाव (चिपळूण) : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत गोविंदरावजी निकम महाविद्यालय मांडकी पालवण विद्यालयामार्फत ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमामध्ये कृषी उमेद संघाच्या कृषी कन्यांकडून आबिटगाव गावचे सरपंच सुहास भागडे यांच्या शेतामध्ये आधुनिक पद्धतीने भात लागवड केली.

लाईन ट्रान्सप्लांटींग या आधुनिक पद्धतीचा वापर करून नियोजितपणे शेत तयार केले. आबिटगावातील गावकऱ्यांना आधुनिक पद्धतीचा वापर करून शेती कशी केली जाईल याचे महत्त्व पटवून दिले.