केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उद्या मुंबई-गोवा महामार्गाची हवाई पाहणी करणार!
रत्नागिरी दि. २९ : केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम बुधवारी सायंकाळी जाहीर झाला आहे. शासनाकडून प्राप्त झालेल्या त्यांच्या अधिकृत दौऱ्यानुसार ना. गडकरी हे रायगड जिल्ह्यातून इंदापूर ते लांजा तालुक्यातील वाकेड पर्यंतच्या मुंबई गोवा महामार्गाची हवाई पाहणी करणार आहेत. ना. गडकरी हे हवाई पाहणी करणार असलेल्या आरवली ते वाकेड पर्यंत महामार्गाचे काम रखडलेले असल्यामुळे या संदर्भात गुरुवारच्या दौऱ्यात काय भूमिका स्पष्ट करतात, याकडे कोकणवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.
कार्यक्रमानुसार गुरुवार 30 मार्च 2023 रोजी सकाळी 9.10 वाजता हेलिपॅड, खारपाडा जवळ, जिल्हा रायगड येथून हेलिकॉप्टरने
ना. गडकरी यांचे पाली हेलिपॅड, जिल्हा रत्नागिरीकडे प्रयाण. (राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वरील इंदापूर ते वाकेड या लांबीतील चौपदरीकरण कामाची हवाई पाहणी.) सकाळी 11.45 वाजता पाली हेलिपॅड, बाजारपेठ, जिल्हा रत्नागिरी येथे आगमन. सकाळी 11.50 वाजता ते दुपारी 12.10 वाजता उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या निवासस्थानी भेट.दुपारी 12.15 ते 12.25 वाजता मोटारीने नाणीजधाम, जि. रत्नागिरीकडे प्रयाण. दुपारी 12.30 ते 01.00 वाजता भुमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 01.00 वाजता मोटारीने नाणीजधाम, जि. रत्नागिरी येथून प्रयाण. दुपारी 01.10 वाजता पाली हेलिपॅड, बाजारपेठ, जि. रत्नागिरी येथे आगमन. दुपारी 01.15वाजता पाली हेलिपॅड, बाजारपेठ, जि. रत्नागिरी येथून हेलिकॉप्टरने
ना. गडकरी हे प्रयाण
करतील
दुपारी 01.30 वाजता रत्नागिरी विमानतळ येथे
त्यांचे आगमन
होईल. दुपारी 01.30 वाजता मोटारीने रत्नागिरी विमानतळ येथून प्रयाण. दुपारी 01.40 वाजता एमआयडीसी विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन. दुपारी 01.40 वा. ते 02.10 वा. पत्रकार परिषद (स्थळ : एमआयडीसी विश्रामगृह, रत्नागिरी) दुपारी 02.10 वाजता एमआयडीसी विश्रामगृह, रत्नागिरी येथून मोटारीने प्रयाण. दुपारी 02.20 वाजता रत्नागिरी विमानतळ येथे आगमन.दुपारी 02.20 वाजता रत्नागिरी विमानतळ येथून विशेष विमानाने
ना. गडकरी हे नागपूरकडे प्रयाण
करणार आहेत.