कोकण मंडळात ‘म्हाडा’चं घर घेणाऱ्यांसाठी खुशखबर!
चार हजार ७५२ घरांसाठी लॉटरी ; उद्यापासून अर्ज विक्री, १० मे रोजी सोडत
मुंबई : म्हाडा कोकण मंडळाच्या 4,752 घरांसाठी 10 मे रोजी सोडत काढण्यात येणार असून त्याची जाहिरात ६ मार्चला प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच बुधवार, 8 मार्चपासून अर्ज विक्री आणि स्वीकृतीला सुरुवात करण्यात येणार आहे, असे म्हाडाने जाहीर केले.
अनेक बदलांसह आणि नव्या संगणकीय प्रणालीसह सोडत काढण्याची तयारी पूर्ण करून मंडळाने सोडतीचे वेळापत्रक निश्चित केले होते. 11 एप्रिलला सोडत काढण्यात येणार होती. मात्र अर्ज विक्री, स्वीकृती सुरू होण्यास दोन दिवस असतानाच संपूर्ण प्रकिया रद्द करण्यात आली होती. ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्वानुसार 14 भूखंड आणि काही घरे वगळण्याचे आदेश म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर यांनी दिल्याने सोडत पुढे ढकलावी लागली होती. पण आता मात्र सोडतीची तारीख अंतिम करण्यात आली आहे. सोडतीची जाहिरात सोमवारी प्रसिद्ध झाली असून बुधवारपासून अर्ज विक्री, स्वीकृतीस सुरुवात होईल, असे म्हाडाच्या कोकण मंडळाकडून कळविण्यात आले आहे