गणपतीपुळे येथे उद्या अंगारकी यात्रोत्सव
रत्नागिरी तालुका प्रशासनाकडून तयारीचा आढावा
रत्नागिरी : तालुक्यातील गणपतीपुळे येथे मंगळवार १० जानेवारी रोजी अंगारकी चतुर्थीचा योग आहे. हा उत्सव साजरा करण्यासाठी देवस्थान समिती, ग्रामपंचायत गणपतीपुळे व पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.
या अंगारकी चतुर्थीचा योग आहे. हा उत्सव साजरा करण्यासाठी देवस्थान समिती, ग्रामपंचायत गणपतीपुळे व पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.
अंगारकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी तालुका प्रशासनाची आढावा बैठक नुकतीच गणपतीपुळे देवस्थानच्या सभागृहात संपन्न झाली. या बैठकीला तहसीलदार शशिकांत जाधव, प्रांताधिकारी डॉक्टर विकास सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक जयदीप केळकर, संस्थानचे सरपंच व डॉक्टर विवेक भिडे, पंच सहकारी, मुख्य पुजारी अमित घनवटकर व सहकारी गणपतीपुळे सरपंच कल्पना पकये आदींसह विविध यंत्रणांचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते. अंगारकीसाठी भाविक मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी येतात.