चाईल्ड केअरतर्फे वृद्धाश्रमात अन्नदान

उरण (विठ्ठल ममताबादे ) : चाईल्ड केअर सामाजिक संस्था रायगड तर्फे करुणेश्वर वांजे वृद्धाश्रमात अन्न दान करण्यात आले. संस्थेने संस्थापक अध्यक्ष विकास कडू यांच्या नेतृत्वाखाली ९ वर्ष अनेक उपक्रम राबविले आहे. संस्थेचे कार्याध्यक्ष विक्रांत कडू यांच्या वाढदिवसाच्या निमित्त वृद्धाश्रमात अन्नदान करण्यात आले. तसेच वृद्धाना मनोरंजन म्हणून सूर मिलाफ सदरकर्ते विवेक केणी यांचा हा सदाबहार गीताचा कार्यक्रम ही अतिशय खेळी मेळीच्या वातावरण संपन्न झाले.
या कार्यक्रमामुळे वृद्धाश्रमात नवीन चैतन्य निर्माण झाले होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला विक्रांत कडू यांना औक्षण करण्यात आले. नंतर त्यांना शुभेच्छा देऊन, उरण तालुक्यातील सुप्रसिद्ध गायक विवेक केणी यांचा संस्थेतर्फे रायगड विशेष ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विकास कडू यांनी बोलताना सांगितले की “करुणेश्वर वृद्धाश्रम म्हणजे एक समाज मंदिर आहे या मंदिरात सर्व वृद्धांची जी नीटनेटकेपणे सेवा केली जाते त्या बद्दल ईश्वर ढेरे व करुणा ढेरे यांचे करावे तितके कौतुक कमी पडेल यांच्या कार्याला चाईल्ड केअर सामाजिक संस्था रायगड तर्फे मनाचा मुजरा” कार्यक्रमाचे निवेदन पेण तालुक्याचे अक्षय पाटील यांनी केले. संस्थेतर्फे विकास कडू (संस्थापक अध्यक्ष), विक्रांत कडू (कार्याध्यक्ष), विवेक केणी (सदस्य), रोशन धुमाळ (सदस्य), कु. विवेक कडू सदस्य) तसेच करुणेश्वर वृद्धाश्रमचे संचालक ईश्वर ढेरे, उत्कर्ष समिती पेण तालुका अध्यक्ष अक्षय पाटील तसेच वृद्धाश्रमाचे १५ कर्मचारी व ३३ वृद्ध व ४ मुले या कार्यक्रमात हजर होते.
कार्यक्रमांची प्रस्तावना विकास कडू यांनी तर आभार वृद्धाश्रमाचे ईश्वर ढेरे यांनी केले.





