महाराष्ट्र

चिपळुणात पट्टेरी वाघाच्या कातड्यासह तिघांना सापळा लावून पकडले

घटनेशी ‘सिंधुदुर्ग कनेक्शन’ असल्याचे प्रारंभिक तपासात उघड

चिपळूण : पट्टेरी वाघाच्या कातड्याची तस्करी करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या तीन संशयितांच्या मुसक्या चिपळूणमध्ये वनविभाग तसेच दहशतवाद विरोधी पथकाकडून आवळण्यात आल्या आहेत.


चिपळूण तालुक्यात चिवेली फाटा येथे शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. वन विभागाला या संदर्भातील टीप मिळाल्यानंतर दहशतवाद विरोधी पथकाच्या संयुक्त सहकार्याने पट्टेरी वाघाचे कातडे तस्करीसाठी नेणाऱ्या तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.


कोकण पट्ट्यात पट्टेरी वाघाचे अस्तित्व आढळत नसताना संशयितांकडे पट्टेरी वाघाचे कातडे नेमके आले कुठून, याची चौकशी सुरू आहे. कारवाई पथकाकडून करण्यात आलेल्या प्रारंभिक चौकशीत तस्करीच्या या घटनेचे सिंधुदुर्ग कनेक्शन असल्याचे संशयतांकडून उघड झाले आहे. त्यात कितपत तथ्य आहे, याची चौकशी वनविभाग तसेच दहशतवाद विरोधी पथकाकडून सुरू आहे.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button