महाराष्ट्र

चिपळूणच्या तरुणाची पुण्यात हत्या ; दोन तासात तिघे संशयित गजाआड

किरकोळ वादाचा सूड ; दोन तासात तीन संशयित ताब्यात

चिपळूण : पुणे जांभूळ रोडवर झालेल्या किरकोळ वादाचा सूड घेण्यासाठी चिपळूण येथील तरुणाचे अपहरण करून त्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर पुणे पोलिसांनी तपासाची चक्रं वेगाने फिरवून केवळ दोन तासांमध्ये तीन संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. सौरभ शैलेंद्र मयेकर (वय २१ वर्ष, मूळ गाव रा. वालोपे, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी, सध्या रा. एक्झर्बिया सोसायटी, जांभूळ, ता. मावळ) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.


तिघांनी सौरभ मयेकरचे अपहरण केले होते. त्यानंतर त्याला साते गावच्या हद्दीतील ओढ्यात नेऊन डोक्यात दगड मारून त्याचा खून केला. ही घटना सोमवारी घडली. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या दोन तासांत खून करणाऱ्या तिघा आरोपींना अटक केली.


या प्रकरणी व्हिजन सिटी जांभूळ येथील १८ वर्षीय संशयित आरोपी व दोन अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. यातील एक अल्पवयीन आरोपी जांभूळ तर दुसरा वडगाव माळीनगर येथील रहिवासी आहे.


सौरभ मयेकर याची आरोपींसोबत जांभूळ रोडवर भांडण झाले होते. यात सक्षम आनंदे याच्या पाठीवर कटरने वार करण्यात आला होता. या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी मयेकर याची गाडी अडवून त्याचे अपहरण केले. ब्राह्मणवाडी साते गावच्या हद्दीत असलेल्या खापरे ओढ्याजवळ नेऊन त्याला मारहाण केली तसेच डोक्यात दगड घालून त्याचा खून केला.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button