ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रराजकीय

छत्रपतींच्या रायगडातला ‘मावळा’ मराठवाडा पूरग्रस्तांच्या मदतीला!

उरण ( विठ्ठल ममताबादे : मराठवाड्यातील (Marathwada) भीषण पूरस्थितीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी (Farmers) रायगडातून (Raigad) माणुसकीचा ओलावा घेऊन मदतीचा हात पुढे आला आहे. खालापूर (Khalapur) तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाचे तालुका अध्यक्ष हरेश पाटील (Haresh Patil) यांनी आपल्या सहकारी मित्रांच्या मदतीने जीवनावश्यक वस्तू आणि धान्याची मोठी मदत पूरग्रस्तांसाठी जमा केली आहे.

​यामध्ये स्वतःच्या घरातील धान्य तसेच कपडे, चटया, झाडू, बिस्किटे, गहू, तांदूळ, आटा, शालेय वस्तू, वह्या इत्यादींचा समावेश होता. ही सर्व मदत त्यांनी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) आणि संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे (Supriya Sule) यांच्याकडे सुपूर्द केली.

‘रायगडचा मावळा कधी मागे हटणार नाही’

​प्रसार माध्यमांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी रायगडातून (Raigad News) आलेल्या या मदतीचा विशेष उल्लेख केला. “रायगडमध्ये आजही माणुसकी (Manuski) आणि छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) शिकवण शिल्लक आहे. महाराष्ट्रावर आलेलं प्रत्येक संकट थोपवण्यासाठी रायगडचा मावळा छाती पुढे करतो,” असे ते म्हणाले.

​खालापूर तालुका अध्यक्ष हरेश पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “आपत्कालीन परिस्थितीत रायगड (Raigad Flood Relief) कधीही मागे राहणार नाही.” जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यातून ही मदत गोळा करण्यात आली आणि पक्ष कार्यालयाकडे सुपूर्द करण्यात आली.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button