गणपतीपुळ्यातील मिनी सरस प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा रद्द

गणपतीपुळे : देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाचा दुखवटयामुळे रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथे आयोजित करण्यात आलेल्या मिनी सरस प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला आहे. उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला असला तरी प्रदर्शन मात्र सुरू आहे.
प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे गणपती मंदिराच्या परिसरात असलेल्या असलेल्या देवबागेमध्ये ग्रामीण भागातील बचत गटामधील महिलांच्या कर्तृत्वाचे व कौशल्याचे आणि उत्पादित मालाचे प्रदर्शन व विक्री प्रदर्शन २८ डिसेंबर ते १ जानेवारी 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.या प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ 28 रोजी दुपारी महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत व राज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार होता. परंतु माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे दुःखद निधन झाल्याकारणाने या ठिकाणी दुखवटा पाळण्यात आला आहे. त्यामुळे या सरस प्रदर्शनाचे मोठ्या थाटामाटात होणारे उद्घाटन रद्द करण्यात आल्याची माहिती संबंधित यंत्रणांकडून देण्यात आली.
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान अंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने विभागस्तरीय व जिल्हास्तरीय सरस प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.या प्रदर्शनामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण 75 स्टॉल सहभागी झाले असून त्यामध्ये महिला बचत गटांनी महिला बचत गटांनी उपस्थत केलेल्या विविध वस्तू व उत्पादनांचा समावेश आहे समावेश आहे.