नवनियुक्त आमदारांची यादी राज्यपालांना सादर
मुंबई: निवडणूक आयोगाचे उपमुख्य निवडणूक आयुक्त हिरदेश कुमार व राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन, मुंबई येथे भेट घेऊन विधानसभा निवडणूक निकालाची अधिसूचना, निवडून आलेल्या सदस्यांची यादी व राजपत्राची प्रत सादर केली.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर झाल्यानंतर आता सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. महायुतीतील घटक पक्षाच्या श्रेष्ठींनी निवडून आलेल्या आमदारांना मुंबईत बोलावून घेतले असून त्यांच्या बैठका सुरू आहेत.
राज्य मंत्रिमंडळाची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपत असल्याने उद्या दिनांक 25 रोजी महायुतीकडून सरकार स्थापनेचा राज्यपालांकडे दावा करून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह प्रमुख मंत्र्यांना शपथ दिली जाण्याची अपेक्षा आहे. या संदर्भातील घडामोडींना शनिवारच्या मतमोजणीनंतर रविवारी प्रचंड वेग आला आहे.