युवा तायक्वांदो रत्नागिरीच्या वतीने आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा
रत्नागिरी : रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन याची अधिकृत संलग्न असलेले युवा मार्शल तायक्वांदो ट्रेनिंग सेंटर रत्नागिरी साळवी स्टॉप प्रशिक्षण वर्गात आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्यात आला.
शुक्रवार 21 जून 2024 रोजी ओम साई मित्र मंडळ सभागृह येथे युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिंग सेंटर यांच्यावतीने आंतरराष्ट्रीय योगा दिवस निमित्त अनेक व्यायाम व आसनाची माहिती योग प्रशिक्षिका सौ. श्रद्धाताई केदारी यांनी सर्व तायक्वांदो खेळाडूंना देत मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणात प्रमुख प्रशिक्षक राम कररा, सह प्रशिक्षक प्रतीक पवार, माहिला प्रशिक्षिका सौ. शशीरेखा कररा, सई सुवारे, सौ. तनवी साळुंखे यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमात पालक वर्ग आवर्जून उपस्थित राहुन आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी सर्व खेळाडूंना प्रमुख प्रशिक्षक यांनी योग माहिती दिली. योगा हा दिवस केवळ व्यायाम नाही तर अनेक प्रकारात योगा केला जातो.
पूर्वीपासून योगाचा वापर ध्यान या माध्यमातून स्वतःवर नियंत्रण ठेवाण्या साठी उपयोग करत असे तसेच कोणत्या ही परिस्थितीतीत तुम्ही किती कौशल्याने संपर्क आणि कृती करू शकता याचे प्रतिबिंब आहे तसेच योगाचे मार्ग अवलंबून शारीरिकच नव्हे तर मानसिक आजारावर मात करून निरोगी ठेऊ शकता, असे सांगत योगाचे महत्व खेळाडूंना पटवून देत आंतरराष्ट्रीय योगा दिवस उत्साहाने साजरा करण्यात आला.