महाराष्ट्र
रत्नागिरीतील ‘इस्कॉन’ मंदिरात पुष्पाभिषेक कार्यक्रम उत्साहात
रत्नागिरी : ‘इस्कॉन’च्या रत्नागिरी एमआयडीसी क्षेत्रात असलेल्या मंदिरात रविवार दि. १५ जानेवारी रोजी सायंकाळी पुष्पाभिषेक कार्यक्रम भाविकांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात संपन्न झाला.
येथील मिरजोळे एमआयडीसी क्षेत्रात लायन्स आय हॉस्पिटलनजीक असलेल्या श्री श्री निताई सुंदर नवद्वीप चंद्र मंदिरात श्री श्री राधा माधव यांचा पुष्य अभिषेक आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाविकांकडून भगवंतांना ५६ भोग अर्पण करण्यात आले.
यानिमित्त रविवारी सायंकाळी ६:३० ते ७:०० – गौर आरती व कीर्तन, ७:०० ते ८:०० – प्रवचन, ८:००ते ८:३० – आरती, पुष्य अभिषेक, ८:३० ते ९ – कीर्तन तसेच
९:०० ते ९:३० – महाप्रसाद या रूपरेषेनुसार कार्यक्रम पार पडले. रत्नागिरी शहर परिसरातील अनेक भाविकांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन भगवान श्रीकृष्णाची सेवा केली.