रत्नागिरीत सुशिक्षित बेरोजगार अभियंता व मजूर सह. संस्थांकरिता कामवाटप समितीची मंगळवारी सभा
रत्नागिरी, दि. 26 (जिमाका):- जिल्हा परिषद रत्नागिरीची सुशिक्षित बेरोजगार अभियंता व मजूर सहकारी संस्थांकरिता कामवाटप समितीची सभा 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा परिषदेतील कै. शामराव पेजे सभागृहात आयोजित करण्यात आली असून कामवाटप समिती सभेमध्ये रु. 10 लक्ष च्या आतील कामांचे वाटप होणार आहे.
जिल्हयातील मजूर सहकारी संस्थांना कामांचे वाटप सकाळ 11 ते 11.30 वा. या वेळेत होणार आहे तर सुशिक्षित बेरोजगार अभियंता (विद्युत) यांना कामांचे वाटप सकाळी 11.30 ते दुपारी 12 वाजता या वेळेत होणार आहे.
मंडणगड तालुक्यातील स्थापत्य सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना दुपारी 12 ते 12.30 वाजता, दापोली तालुक्यातील स्थापत्य सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना दुपारी 12.30 ते 1 वाजता, संगमेश्वर तालुक्यातील स्थापत्य सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना दुपारी 1 ते 1.30 वाजता, राजापूर तालुका स्थापत्य सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना दुपारी 1.30 ते 2 वाजता, लांजा तालुक्यातील स्थापत्य सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना 2.30 ते 3 वाजता, रत्नागिरी तालुक्यातील स्थापत्य सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना दुपारी 3 ते 3.30 वाजता, खेड तालुक्यातील स्थापत्य सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना दुपारी 3.30 ते 4 वाजता , चिपळूण तालुक्यातील स्थापत्य सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना दुपारी 4 ते 4.30 वाजता आणि गुहागर तालुक्यातील स्थापत्य सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना दुपारी 4.30 ते सांयकाळी 5 वाजता या वेळेत रु. 10 लक्ष च्या आतील कामांचे वाटप करण्यात येणार असल्याचे सदस्य सचिव कामवाटप समिती, जि. प. तथा कार्यकारी अभियंता, जि.प. बांधकाम विभाग यांनी कळविले आहे.