महाराष्ट्र
रत्नागिरी किनारपट्टीवर वादळसदृश परिस्थिती
रत्नागिरी : हवामानात बदल झाल्याचे गुरुवारी सकाळपासून जाणवू लागले आहे. रत्नागिरी शहर परिसरात आज सकाळपासूनच वाऱ्याचा वेग वाढला असून नागरिकांना दारे खिडक्या बंद करून घ्याव्या लागतील, इतका वाऱ्याचा वेग होता.
गुरुवारी सकाळी किनारपट्टीवरील हवामानात अनपेक्षित बदल अनुभवायला मिळाला. सकाळपासूनच वाऱ्याचा वेग वाढल्यामुळे झाडे अक्षरशः पिळवटून निघत होती तर नागरिकांच्या घरांची दारे तसेच खिडक्यांची तावदाने एकमेकांवर जोरजोराने आदळत होती. भल्या सकाळी निर्माण झालेली वादळ सदृश्य परिस्थिती अकरा वाजेपर्यंत थांबली नव्हती.