रत्नागिरी प्रभाग १० मधील नगरसेवक पदासाठी ४ डिसेंबरला सुधारित निवडणूक कार्यक्रम

रत्नागिरी : जिल्हयातील 4 नगर परिषदा व 3 नगरपंचायतीमध्ये सार्वत्रिक निवडणूका
आहेत. पैकी केवळ रत्नागिरी नगर परिषदेमध्ये नामनिर्देशनपत्रांची छाननी झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निर्णयाविरोधात प्रभाग क्रमांक 10 करिता दोन अपिले दाखल करण्यात आली होती व त्यांचा निकाल न्यायालयाकडून 25 नोव्हेंबर 2025 रोजी जाहीर करण्यात आला आहे.
राज्य निवडणूकआयोगाकडील सदर आदेशानुसार प्रभाग क्रमांक 10 मधील सदस्य पदाकरिता जाहीर करण्यात आलेली निवडणूक स्थगित करण्यात येत असून त्याबाबतचा सुधारीत निवडणूक कार्यक्रम 4 डिसेंबर 2025 रोजी जाहीर करण्यात येईल, याची नोंद संबंधित प्रभागातील मतदार व उमेदवारांनी घ्यावी, असे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी कळविले आहे.
राज्य निवडणूक आयोगाकडील रानिआ २०२५/सुनिका/नप/प्र.क्र.१४/का-६, 29 नोव्हेंबर 2025 च्या आदेशान्वये नगरपरिषदा/नगरपंचायतीमध्ये ज्या जागेसाठी अपिल दाखल केले होते. परंतु अपिलाचा निकालसंबंधित जिल्हा न्यायालयाकडून 22 नोव्हेंबर 2025 नंतर म्हणजेच 23 नोव्हेंबर 2025 किंवा तद्नंतर देण्यात
आलेला आहे अशा नगरपरिषदा/नगरपंचायतीच्या सदस्य पदाच्या त्या जागेच्या निवडणूका 4 नोव्हेंबर 2025 च्या निवडणूक कार्यक्रमानुसार घेण्यात येवू नयेत, असे आदेशित करण्यात आले आहे.
रत्नागिरी नगरपरिषदेच्या अध्यक्ष पदाकरिताचे मतदान (प्रभाग क्रमांक 10 समवेत) व उर्वरित
प्रभागांकरिता मतदान नियोजित वेळापत्रकानुसार होईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.





